निसर्गाला आपल्या उद्याच्या पिढीसाठी, आपल्या कुटुबासाठी व आपल्यासाठी स्वतासाठी अधिक निरोगी ठेवण्यासाठी आम्हाला आमचे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी तूमच्या मदतीची आवश्यकता आहे. स्वच्छ, समृद्ध व निरोगी निसर्गासाठी तूमची एक वेळ किंवा नियमित आम्हाला मदत म्हणून वृक्ष, खते, शेती विषयक अवजारे, शैक्षणिक शालेय साहित्य स्वरूपात कोणतीही वस्तु मोठी किंवा लहान स्वागतार्ह आहे आणि आपली मदत आम्हाला निसर्गासाठी समाजासाठी काम करण्यास मदत करेल.
समृद्ध महाराष्ट्र उज्ज्वल महाराष्ट्र ही एक सामाजिक उपक्रम आहे जी
पर्यावरण संवर्धन , वृक्षारोपण आणि शिक्षण क्षेत्रातील जागरूकता यासाठी कार्य करते.
आमचं ध्येय — “हरित आणि शिक्षित महाराष्ट्र” घडवणे.
आम्हाला आर्थिक मदत नको,
पण तुम्ही खालील मार्गांनी आमच्या उपक्रमात हातभार लावू शकता
१. वृक्षारोपण साहित्य दान करा
फळझाडे, औषधी झाडे, सावलीची झाडे
खते, पाणी देण्यासाठी साधनं
२. शैक्षणिक साहित्य द्या
वापरात नसलेली किंवा नवी पुस्तकं
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्टेशनरी (वह्या, पेन, पेन्सिल, चार्ट्स)
पर्यावरण शिक्षणासाठी साहित्य / पोस्टर / मॉडेल्स
३. स्वयंसेवक म्हणून जोडा
वृक्षारोपण मोहिमेत सहभाग
शाळांमध्ये पर्यावरण जनजागृती सत्रे
साहित्य वितरण आणि संकलन मोहिमेत मदत
संपर्क:
समृद्ध महाराष्ट्र उज्ज्वल महाराष्ट्र
मुख्यालय — पुणे, महाराष्ट्र
ईमेल- 29suhaspatole@gmail.com