निसर्ग संरक्षण, प्रदूषण नियंत्रण, वृक्षारोपण, आणि पर्यावरणपूरक जीवनशैली याबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी पथनाट्य (Street Play) हा प्रभावी माध्यम आहे.या स्पर्धेचा उद्देश आहे - तरुण, विद्यार्थी, आणि नाटककारांना निसर्ग विषयक विचार लेखनाद्वारे मांडण्याची संधी देणे.
“निसर्ग आपली जबाबदारी”
किंवा
“हरित भविष्यासाठी आजचा निर्धार”
(भाग घेणारे इच्छेनुसार कोणत्याही पर्यावरणाशी संबंधित उपविषयावर लिहू शकतात - जसे की प्लास्टिक बंदी, वृक्षारोपण, जलसंवर्धन, हवामान बदल इ.)
प्रकार: पथनाट्य लिखाण (Script Writing)
भाषा: मराठी
कालावधी: १० ते १५ मिनिटांचा पथनाट्य लेखन
शब्दमर्यादा: अंदाजे ८०० ते १२०० शब्द
लेखकांची संख्या: एक किंवा जास्तीत जास्त २ व्यक्तींचा गट
लेखन पूर्णपणे स्वतःचं आणि अप्रकाशित असावं.
निसर्ग / पर्यावरण विषयावर केंद्रित असणे आवश्यक.
संवाद, व्यक्तिरेखा, आणि शेवट यामध्ये सकारात्मक संदेश असावा.
लिखाण .pdf किंवा .docx स्वरूपात अपलोड करावे.
“निसर्ग वाचवा – संस्कृती जपा”
तुमचे शब्द बदल घडवू शकतात
चला, पथनाट्याच्या माध्यमातून पर्यावरणाची गोष्ट जगासमोर मांडूया!
🥇 पहिला क्रमांक – भेट वस्तु + सन्मानपत्र
🥈 दुसरा क्रमांक – भेट वस्तु + सन्मानपत्र
🥉 तिसरा क्रमांक – भेट वस्तु + सन्मानपत्र
🎖️ विशेष उल्लेखनीय निबंधांना प्रोत्साहन पारितोषिक