पुणे, तळजाई परिसरामध्ये आम्ही केलेले काही प्रयत्न ( स्थळ चित्र )
खाजगी व्यक्ती संस्था, शासकीय विकास योजना, पुणे महानगरपालिका व पुणे मेट्रो यांच्या विविध विकास कामासाठी वृक्ष तोड करून व काही वृक्ष चुकीच्या पध्दतीने स्थळातरीत करून खालील चित्रामध्ये दिसत असल्या प्रमाणे निसर्गाची हानी झाली असून आशा प्रकारे होणारी निसर्गाची हानी/ नुकसान थांबवण्यासाठी आपल्या सर्वामार्फत पर्यावरण संवर्धनासाठी आमच्या सोबत सामील व्हा.
वाढत्या लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण, देशामधील विकसित होणारे महामार्ग व विविध विकासकामे यांच्या समवेत ध्वनी प्रदूषण, वायु प्रदूषण व रोगराई पसरत आहे. तसेच मानवीकरणामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूस कचऱ्याचे समराज्य पसरत आहे त्यामुळे आपली शहरे गावे वसत्या मध्ये विविध आजार होत आहेत खालील चित्रामध्ये दिसत असल्या प्रमाणे मानवामुळे होणारी हानी झाली असून आशा प्रकारे होणारी निसर्गाची हानी/ नुकसान थांबवण्यासाठी आमच्या सोबत सामील व्हा. आपण मिळून अशा प्रकारची निसर्गाची हानी होणार नाही यासाठी प्रयत्न करू.